भारतात मोटरसायकलच्या किमतीत या कंपनीने काढली स्वस्त इलेक्ट्रिक कार Ligier Mini EV एका चार्जवर 200 किमी धावणार

Ligier Mini EV

Ligier Mini EV ही इलेक्ट्रिक कार भारतात 1 लाख रुपयांमध्ये लॉन्च होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकाच चार्जवर 200 किमीपर्यंतची रेंज देणारी ही कार लोकांना परवडणाऱ्या इलेक्ट्रिक कारसाठीभारतात इलेक्ट्रिक वाहनांबाबतचा कल वाढताना दिसत असून, याचा फायदा घेत विविध कंपन्या स्वस्त आणि परवडणाऱ्या इलेक्ट्रिक कार बाजारात आणण्याच्या प्रयत्नात आहेत. अशाच एका महत्वाकांक्षी प्रोजेक्टचा भाग म्हणजे Ligier Mini EV, जी लवकरच भारतात लॉन्च होण्याच्या तयारीत आहे. या कारची किंमत फक्त 1 लाख रुपये असण्याची शक्यता असून, एका चार्जवर ही कार 200 किमीची रेंज देऊ शकते.

Ligier Mini EV ची डिझाईन आणि लूक

Ligier Mini EV ही कार अत्यंत आकर्षक पण दिसायला छोटी आहे .या कारचे मॉडेल युरोपियन मॉडेलवर आधारित असुन या कारची लांबी 2958 मिमी आणि रुंदी 1499 मिमी , उंची 1541 मिमी आहे. आणि ही 2-सीटर कार असून यामध्ये दोन दरवाजे आहेत आणि तिच्या अलॉय व्हील्स स्टायलिश आणि स्पोर्टी आहेत.

कार च्या पुढील भागात पातळ लोखंडी जाळी, गोल हेडलॅम्प्स आणि मागील भागात मोठे काचेचे टेलगेट तसेच गोल LED टेललॅम्प्स यामुळे या कारला अत्याधुनिक लूक मिळतो.या गाडीच्या चाकांच्या कमानी भोवती असलेले बॉडी क्लेडिंग या कारला एक खडबडीत आणि रफ लूक देतात.

आधुनिक फीचर्सने सज्ज

Ligier Mini EV मध्ये अत्याधुनिक फीचर्स दिसणार आहेत. यामध्ये आपल्याला 10-इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऍपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो सपोर्ट, पॉवर स्टीयरिंग, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, आरामदायी ड्रायव्हर सीट, आणि कोपऱ्यांमध्ये AC वेंट्स यांचा समावेश आहे.

बॅटरी आणि रेंज पर्याय

Ligier Mini EV तीन वेगवेगळ्या बॅटरी पॅक पर्यायांसह ही कार उपलब्ध होण्याची शक्यता आहे:

1. 4.14 kWh बॅटरी मध्ये 63 किमी रेंज

2. 8.2 kWh बॅटरी मध्ये 123 किमी रेंज

3. 12.42 kWh बॅटरी मध्ये 192 किमी रेंज

या बॅटरी पॅकची क्षमता आणि रेंज ही स्वस्त कारसाठी मोठा गेम चेंजर ठरू शकते.

व्हेरियंट्सचे विविध पर्याय

1. G.OOD

2. I.DEAL

3. E.PIC

4. R.EBEL

प्रत्येक व्हेरियंटमध्ये फीचर्स आणि रेंज यामध्ये थोडाफार फरक असेल, त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार पर्याय निवडता येईल.

हे पण वाचा… Honda Activa 6G: स्टाइल, प्रदर्शन और सुविधा का परफेक्ट संगम”

भारतासाठी स्वस्त पर्याय

Ligier Mini EV ची भारतामध्ये किंमत फक्त 1 लाख रुपये असू शकते, असे संकेत मिळत आहेत. ही किंमत इतर इलेक्ट्रिक कारच्या तुलनेत खूपच कमी आहे, त्यामुळे मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी ही एक परवडणारी आणि आकर्षक निवड ठरू शकते.

इलेक्ट्रिक कार मार्केटमधील स्पर्धा

सध्या भारतीय बाजारात Tata, Mahindra, MG Motors यांसारख्या मोठ्या कंपन्यांनी इलेक्ट्रिक कारच्या विक्रीमध्ये आघाडी घेतलेली आहे. Ligier Mini EV ही कार आधुनिक आणि स्वस्त पर्याय म्हणून ग्राहक या कार कडे पाहू शकतात. यामुळे बाजारात स्पर्धा वाढेल आणि ग्राहकांना अधिक फायदे मिळतील.

भारतात लॉन्चची प्रतीक्षा

सध्या Ligier Mini EV च्या भारतातील लॉन्चबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, या कारच्या चाचण्या आणि यशस्वी लॉन्च झाल्यास ती इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात मोठा बदल घडवेल, याची खात्री आहे.

Ligier Mini EV ही स्वस्त, आकर्षक आणि पर्यावरणपूरक कार असून तिच्या लॉन्चने भारतीय ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहनांकडे वळण्यासाठी मोठा संधी मिळेल. एका चार्जवर 200 किमी रेंज देणारी आणि आधुनिक फीचर्सने युक्त असलेली ही कार भविष्यातील वाहन क्षेत्राला नवीन दिशा देऊ शकते.

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत