oneplus पुन्हा एकदा आपल्या ‘फ्लॅगशिप किलर’ ऑफरिंगसह बाजारात खळबळ उडवायला सज्ज! चीनमध्ये oneplus 13T लाँच होणार असताना, भारतात पहिल्यांदाच ‘oneplus 13s’ नावाने खास स्मार्टफोन येणार असून, प्रीमियम फीचर्स आता मिळणार किफायतशीर किमतीत.
Table of Contents
oneplus पुन्हा एकदा आपल्या नव्या प्रीमियम स्मार्टफोनसह भारतीय मार्केटमध्ये धडक देण्याच्या तयारीत आहे. चीनमध्ये 24 एप्रिल रोजी वनप्लस 13T लाँच होणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. याच दरम्यान, भारतासाठीही एक खास व्हेरिएंट तयार केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. नव्या रिपोर्टनुसार, हा स्मार्टफोन ‘OnePlus 13s’ या नावाने भारतात लाँच केला जाणार असून तो 2025 च्या दुसऱ्या तिमाहीअखेर म्हणजे जून महिन्यात सादर केला जाऊ शकतो.
oneplus 13R आणि OnePlus 13 आधीच भारतात दाखल झाले आहेत, त्यामुळे ‘S’ सीरिजमधील हा पहिलाच स्मार्टफोन असणार आहे. हे डिव्हाइस प्रमुख वैशिष्ट्यांसह सुसज्ज असून comparatively किमतीत कमी असणार असल्याने प्रीमियम अनुभव देणारा एक परवडणारा पर्याय ठरू शकतो.
oneplus 13s: अपेक्षित वैशिष्ट्ये
स्मार्टप्रिक्सच्या अहवालानुसार, वनप्लस 13s मध्ये 1.5K रिझोल्यूशन असलेली AMOLED स्क्रीन मिळू शकते, जी 120Hz रिफ्रेश रेटसह येईल. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 सीरिजचा प्रगत प्रोसेसर दिला जाण्याची शक्यता आहे, जो 16GB RAM आणि 512GB स्टोरेजसह जोडलेला असेल.
कॅमेराच्या बाबतीत, यामध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला जाण्याची शक्यता असून त्यात सोनीचे प्रगत सेन्सर्स आणि OIS (ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन) असेल. सेल्फीसाठी 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा असू शकतो.
हा स्मार्टफोन Android 15 वर आधारित OxygenOS 15 वर चालेल, अशी माहितीही मिळते. तसेच, यात ऑप्टिकल किंवा अल्ट्रासॉनिक फिंगरप्रिंट स्कॅनर, IP68 किंवा IP69 प्रमाणपत्र मिळालेली वॉटर व डस्ट रेसिस्टन्स, आणि एक जबरदस्त 6000mAh बॅटरी दिली जाऊ शकते. बॅटरी 80W वायर्ड व 50W वायरलेस फास्ट चार्जिंगसह येण्याची शक्यता आहे.
oneplus 13T: चीनमधील सादरीकरण आधीच निश्चित
दुसरीकडे, चीनमध्ये लाँच होणाऱ्या OnePlus 13T बद्दलची माहिती कंपनीने स्वतः जाहीर केली आहे. या फोनमध्ये 6.32 इंची फ्लॅट AMOLED डिस्प्ले असेल, ज्याला 1.5K रिझोल्यूशन आणि 120Hz चा रिफ्रेश रेट मिळेल. कंपनीने यासाठी नवीन ‘Shortcut Key’ दिला असून पारंपरिक ‘Alert Slider’ काढून टाकला आहे. याचा शरीरभाग पूर्णतः मेटलचा असेल, आणि फोनचे वजन सुमारे 185 ग्रॅम असेल.
हे पण वाचा..samsung m56 5G भारतात झाला लॉन्च; जलद प्रोसेसर, स्लीम डिझाईन आणि दमदार फीचर्सची भरघोस सौगात
कॅमेरा डिटेल्स: ड्युअल 50MP सेन्सर
oneplus 13T मध्ये 50MP Sony IMX906 सेन्सर असलेला अल्ट्रा-ब्राइट मुख्य कॅमेरा दिला गेला आहे. त्यासोबत 50MP चा 2x ऑप्टिकल झूम टेलिफोटो कॅमेरा असेल. मात्र, यामध्ये अल्ट्रा-वाइड कॅमेरा नसेल. 4x लॉसलेस झूम, शॅडोलेस कॅप्चर, लाईव्ह फोटो, AI इमेजिंग यांसारखे प्रगत फिचर्स हे OPPO फ्लॅगशिप प्रमाणे यातही मिळतील. मुख्य कॅमेरासाठी f/1.8 तर टेलिफोटो लेन्ससाठी f/2.0 अॅपर्चर दिले जाणार आहे.
चिपसेट आणि इतर वैशिष्ट्ये
oneplus 13T मध्ये नवीन Snapdragon 8 Elite चिपसेट देण्यात येईल, जो OnePlus 13 प्रमाणेच फ्लॅगशिप दर्जाचा प्रोसेसर आहे. याशिवाय, गेमिंगसाठी यामध्ये खास Wi-Fi G1 चिपचा वापर केला आहे. फोनमध्ये LPDDR5X RAM आणि UFS 4.0 स्टोरेज तंत्रज्ञान दिले जाईल. यात 6000mAh पेक्षा जास्त बॅटरी क्षमता दिली जाईल आणि 80W फास्ट चार्जिंगसह येईल, असा अंदाज आहे.
रंग पर्याय आणि सॉफ्टवेअर
वनप्लसने आपल्या नवीन फ्लॅगशिप फोनसाठी जोरदार तयारी केली आहे. भारतात येणाऱ्या oneplus 13s द्वारे कंपनी बजेटमध्ये प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या वापरकर्त्यांना आकर्षित करू इच्छित आहे. दुसरीकडे, oneplus 13T चीनमध्ये उघडण्याच्या मार्गावर असून त्याचे अनेक फीचर्स आधीच अधिकृतपणे उघड करण्यात आले आहेत. दोन्ही फोन आगामी काळात प्रीमियम स्मार्टफोन मार्केटमध्ये नवे मापदंड उभे करू शकतात, अशी शक्यता नाकारता येत नाही.
हे पण वाचा..mahindra thar xuv700 facelift 2026 मध्ये होणार लॉन्च!<br>